भिमाशंकर(पुणे) : बारा ज्योर्तिलिंग पैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे ही आज सायंकाळी पाच वाजता घंटानाद करण्यात आला. व देशात तसेच राज्यात कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांचे आभार मानण्यात आले.
तसेच जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना ही यावेळी सर्व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये हा घंटनाद करण्यात आला. त्याचबरोबर शंख सुद्धा वाजविण्यात आला.