भीमाशंकरचा विकास आराखडा संसदेत मांडणार- कोल्हे

भीमाशंकर: शिरुर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भीमाशंकर येथील पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. तसेच शिवलिंगावर जलाभिषेक केला. यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची प्रतिमा देऊन डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर खासदार कोल्हे यांनी भीमाशंकर विकास आराखड्यातील विकास कामांची पाहणी केली. भीमाशंकरचा विकास आराखडा आपण संसदेत मांडणार, असे यावेळी कोल्हे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.