मंचर -पारगांव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोडणी मजूर आणि ट्रॅक्टर चालक अशा एकूण 6500 जणांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कारखाना स्थळावर गुरुवारी (दि. 2) करण्यात आले, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.
लॉकडाऊन असल्यामुळे ऊसतोड कामगारांना सरकारी निर्णयानुसार घरी पाठवता येणे शक्य नाही असे सांगून बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक आणि कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार ऊसतोड मजुरांना सर्व सुविधा कारखाना पुरविणार आहे.
टायर बैलगाडी चालक आणि ऊसतोड मजूर अशा 6500 जणांनी याचा लाभ घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली.