मुंबईमार्गे भीमाशंकर अंतर कमी होणार

चाकण – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या खेड तालुक्‍यातील भीमाशंकर या पवित्र तीर्थक्षेत्राला मुंबई मार्गे भीमाशंकमुंबईमार्गे भीमाशंकर अंतर कमी होणार रला येण्यासाठी 2008पासून प्रलंबित असलेला उरण-भीमाशंकर हा रस्ता मंजूर करण्यासाठी यावर्षी खेड तालुक्‍यातील वन विभागाच्या बाहेरचा रस्ता करण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने आता खेड तालुक्‍यातील या रस्त्याचा प्रलंबित विषय मार्गी लागणार आहे, अशी माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी येथे दिली.

खेड तालुक्‍यातील पूल व रस्त्यांच्या अकरा महत्वाच्या कामांसाठी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात 20 कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर तालुक्‍यातील महत्त्वाचे विषय तारांकित प्रश्‍न, लक्षवेधी, अशासकीय ठराव व विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. आमदार गोरे यांनी चाकणमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. याप्रसंगी सेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे उपस्थित होते.

राज्याच्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात सन 2019-20साठी यावर्षी खेड तालुक्‍यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तालुक्‍यातील महत्त्वाच्या अशा एकूण 11 कामांना एकूण 20 कोटी 52 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तालुक्‍यातील दळणवळण सुरळीत होऊन शेतकऱ्यांच्या विकासात वाढ होण्यासाठी तालुक्‍यातील मुख्य रस्ते दुरुस्त करून मजबूत करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने तालुक्‍यातील जवळपास सर्वच मुख्य रस्ते गेल्या 4 ते 5 वर्षांपासून वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.