-->

भीमा कृषी प्रदर्शनात 7 कोटीपेक्षा जास्त उलाढाल

कोल्हापूर : शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळणारे व  एकाच छताखाली शेती पूरक साहित्य मिळणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी  व पशु प्रदर्शन पाहण्यासाठी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मेरीवेदर मैदानावर रविवारी तुडुंब गर्दी झाली होती. रविवार आज तिसरा दिवस असल्याने सह कुटुंब सहपरिवार हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. लहान मुलांनी आज घोड्यावर बसून आनंद लुटला तर दोन हजार किलोमीटर उडणारा पोपट,130 किलो वजनाचा बोकड, दोन फुटी गाय, पावणेतीन फुटाचे नाचणारे घोडे पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी मेरीवेदर मैदानावर मोठी गर्दी केली होती.
कोल्हापूर शहर व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना  शतकातील कृषी, प्लास्टिक कल्चर, पशुपालन, तंत्रज्ञान व अन्य शेती पूरक माहिती मिळावी यासाठी भिमा उद्योग समूहाच्या वतीने माजी खासदार धनंजय महाडिक यांनी या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी प्रदर्शनस्थळी केली होती.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीचा उच्चांक गाठला होता गेल्या तीन दिवसांपासून प्रदर्शनस्थळी  शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.
तीन दिवस चांगला चांगला प्रतिसाद प्रदर्शनास मिळाला गाड्या जवळजवळ महावीर कॉलेज पर्यंत  लागत आहेत.जनावरे पाण्याचे लहान मुलांना खास आकर्षण असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात लहान मुले  आपल्या आई-वडिलांसोबत याठिकाणी  शाळेला सुट्टी असल्याने जनावरे पाहत आहेत त्यांना आकर्षित करणारी घोडे, गायी, म्हैशी, पाडी 1100 किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडा,2 हजार किलोमीटर उडणारा पांढरा पोपट, पक्षी या ठिकाणी एकाच छताखाली आणण्यात आले असल्याने ही जनावरे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत आहे.
हे प्रदर्शन पाहून चांगली उपयुक्त माहिती आम्हाला मिळत आहे आणि सवलतीच्या दरात वस्तू खरेदी करण्यास मिळतात अशा पद्धतीचे प्रदर्शन आयोजित करून माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आम्हाला ग्रामीण भागाच्या जवळ नेले असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या तीन दिवसात जवळजवळ 7 कोटीच्या आसपास प्रदर्शनाच्या माध्यमातून उलाढाल झाली असून याचा फायदा स्टॉलधारकांना झाला आहे. शिवाय तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून 1500 टन तांदुळाची उंचाकी विक्री झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.