भीमा कोरेगाव प्रकरण : रोना विल्सन यांच्या संगणकात आक्षेपार्ह पुरावे पेरण्यात आले; हे काम 22 महिने सुरू असल्याचा अर्सेनलचा दावा

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि कार्यकर्ते रोना विल्सन यांच्या संगणकामध्ये आक्षेपार्ह पुरावे पेरण्यात आले आहेत. हे काम 22 महिने सुरू होते अशी माहिती अमेरिका स्थित डिजिटल फॉरेन्सिक लॅब अर्सेनल कन्सल्टिंगने दिली आहे.

आउटलूक या मासिकाला अर्सेनेलचे अध्यक्ष मार्क स्पान्सर यांनी इ मेलद्वारा मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, या प्रकरणाशी संबंधित डाटा अन्य मुद्‌द्‌यांवर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.

रोना विल्सन आणि अन्य आरोपींच्या प्रकरणात काय झाले आहे, हे शोधण्यात अन्य संस्था अपयशी ठरल्याने आम्ही हे काम हाती घेण्याचे ठरवले. आम्ही केवळ दिवाणी दाव्यांच्या तपासाची कामे हाती घेत नाही तर फौजदारी दाव्यांची प्रकरणेही हाताळतो. आमच्याकडे येणारी सर्वच प्रकरणे त्या अर्थाने संवेदनशील आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. त्यांनी पुण्याच्या विभागीय न्यायवैद्यक संस्थेने या हार्ड डिस्कमंध्ये कॅनताही फेरफार झाला नसल्याचा निर्वाळा दिल्याकडे लक्ष वेधले. त्यावर प्रतिक्रिया देताना स्पान्सर म्हणाले, हे विधान मला आश्‍चर्यकारक वाटते. आमच्या पहिल्या अहवालात, आम्ही काही निष्कर्ष नोंदवले आहेत.

त्यासाठी डिजिटल फॉरेन्सिकमधील तज्ज्ञता अपेक्षित असते. याशिवाय ही गुंतागुंत सोडवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. याशिवाय आम्ही आमच्या पहिल्या अहवालात हल्लेखोरांच्या कृत्याचा तपशील दिला आहे, असे नव्हे तर, आम्ही हल्ल्याच्या कृतीचे स्क्रिनशॉटही दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.