बारामती (प्रतिनिधी) : भीलवाडा पॅटर्नसाठी बारामती सज्ज झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कुरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे सगळे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाहेरील कोणालाही बारामतीत प्रवेश दिला जाणार नाही भीलवाडा पॅटर्ननुसार बारामती शहर व तालुका सीलबंद करण्यात येणार आहे. बारामतीत शासकीय अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे
अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सुनील दराडे, डॉ. सदानंद काळे आदी या प्रसंगी उपस्थित होते