पुणे – नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने शहरातील 7 पूल सोमवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र पाण्याची पातळी काही अंशी ओसरल्याने सोमवारी सायंकाळी एक, तर मंगळवारी चार पूल वाहतुकीसाठी खुले केले होते. परंतु भिडे पूल आणि टिळक पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यांसह पुलावरील पाणी कमी झाल्यास पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
औंधगाव ते डांगे चौक मार्गावरील राजीव गांधी पूल, स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी मार्गावरील जुना सांगवी पूल, भाऊ पाटील रोड ते दापोडीगाव मार्गावरील दापोडी पूल, खडकी बाजार ते साप्रस मार्गावरील जुना होळकर पूल हे मार्ग पाण्याची पातळी कमी झाल्याने पोलिसांनी वाहतुकीसाठी खुले केले. मात्र, डेक्कन येथील भिडे पूल, मनपासमोरील टिळक पुलावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.