बीडचा सुरेश पालवे ठरला भैरवनाथ केसरी…!

उंचखडक येथील ग्रामदैवत यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा

बेल्हे- उंचखडक (राजुरी, ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या आखाड्यात बीड जिल्ह्याचा सुरेश पालवे “2019 चा भैरवनाथ केसरी’ ठरला आहे.

उंचखडक (ता. जुन्नर) येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला होता. या आखाड्यात राज्यातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते. या आखाड्यात मानाची निकाली कुस्ती बीडच्या सुरेश पालवे याने मारली. तो यावर्षीचा भैरवनाथ केसरी मानकरी ठरला असून, त्याला 25 हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.

या कुस्त्यांच्या आखाड्यात पुणे, लोणीकंद, अहमदनगर, सोमाटणे फाटा, पारनेर, पंजाब, मध्यप्रदेश आदी ठिकाणांहून नामांकित मल्ल सहभागी झाले होते. या आखाड्यात पंच म्हणून पहिलवान संजय गुंजाळ, बाळासाहेब कुऱ्हाडे, दत्ता गावडे, पाडुरंग गाडेकर यांनी काम पाहिले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे सदस्य पाडुरंग पवार, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कंडलिक हाडवळे, सरपंच संजय गवळी, उपसरपंच चंद्रकांत जाधव, उंचखडक गावचे सरपंच दत्तात्रय कणसे, युवानेते वल्लभ शेळके, एकनाथ शिंदे, सतीश पाटील औटी, जि. के. औटी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनवणे, अभिनेता अमोल कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

  • मुलींचाही कुस्तीत सहभाग
    यावेळी ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा (सांगली) येथील आण्णासाहेब डांगे कुस्ती संकुलातील कुस्तीपटू मुलींचाही सहभाग होता. यात साक्षी गुंजाळ, सिध्दी पवळे, राणी कावसे, कविता राजपुत, सुरेखा फापाळे, संस्कृती खांडेकर, सायली कुरकूटे, संजना जगदाळे या मल्ल मुलींच्या कुस्त्यांतील डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली.

Leave A Reply

Your email address will not be published.