लंडन – बर्मिंगहॅमपाठोपाठ लंडनमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेतही भारताने वर्चस्व राखले. या स्पर्धेत भारताची ऑलिम्पिकपटू महिला तलवारबाज भवानी देवी हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
सेव्हर गटातील अंतिम सामन्यात भवानीने ऑस्ट्रेलियाच्या वासलेव्हा हिचा 15-10 असा पराभव केला. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळणारी भवानी ही पहिली भारतीय तलवारबाज ठरली होती. त्यानंतर तिने या स्पर्धेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली.
BHAVANI DEVI IS COMMONWEALTH FENCING CHAMPION 🏆
🇮🇳’s @IamBhavaniDevi wins GOLD 🥇 at Commonwealth #Fencing 🤺 Championship 2022 in Senior Women’s Sabre Individual category
She won 15-10 against 🇦🇺’s Vasileva in the Sabre final
Hearty congratulations, Bhavani 🙂#IndianSports pic.twitter.com/8UOs6OcvLm
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2022
भवानीचे वडील एका मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. आई गृहिणी असून तिला 5 भावंडे आहेत. घरची परिस्थिती तशी बिकट असतानाही तिच्या वडिलांनी उसने पैसे घेत तिच्या खेळासाठी मदत केली, तर आईने चक्क आपले मंगळसूत्रासह अन्य दागिनेही गहाण ठेवत तिला पाठिंबा दिला.
घराच्या लाकडी कुपंणाच्या एका लाकडी काठीने भवानीने सुरुवातीला तलवारबाजीचा सराव केला. आता तिची ओळख ऑलिम्पिकपटू व राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक विजेती अशी बनली आहे.