भाऊसाहेब रंगारी गणपती रथाचा बैल बिथरला अन्

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा विसर्जन रथ मध्यरात्री लक्ष्मी रस्त्याला लागला. या गणपतीच्या रथाला जुंपलेल्या बैलांच्या जोडीपैकी एक बैल मोबाइलच्या फ्लॅशमुळे बिथरला. त्यामुळे फ्लॅश बंद करण्याचे आवाहन भक्‍तांना करण्यात आले. लक्ष्मी रस्तावर हे मंडळ आले असताना हा प्रकार घडला.

फोटो काढण्यासाठी झालेल्या गर्दीत अनेक हौशी कलाकारांनी सेल्फी घेताना तसेच फोटो काढताना रात्र असल्यामुळे फ्लॅश ऑन केला. त्याचाच त्रास बैलांना झाला. त्यावेळी बैल जोडी सांभाळणाऱ्या व्यक्‍तीने बैलांची वेसण घट्ट पकडत बैलांवर नियंत्रण मिळवले. यावेळी रथ काहीवेळ रस्त्याच्या कडेला घेण्यात आला. दरम्यान, या काळात बराच वेळ मिरवणूक विजय टॉकिज चौकात थांबून राहिली. त्यानंतर बैलांना शांत करून मिरवणूक पुढे नेण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.