भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने यशाची परंपरा कायम राखली

नगर – भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा बारावी बोर्डाच्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त करीत, आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा शास्त्र विभागाचा निकाल 100 टक्के तर वाणिज्य विभागाचा निकाल 99.10 टक्के लागला आहे.
विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत शास्त्र विभागात पहिली- वंशिता जैन (92.30टक्के), दुसरी- सानिका कानडे (90.15 टक्के), तीसरा- ऋषीकेश पांडेकर (88.46 टक्के), चौथा- यश जाधव (87.38 टक्के), अप्पासाहेब महारनोर (83.84 टक्के), तसेच वाणिज्य विभागात पहिली- नेतल कटारिया, सुमित डोशी (91.38 टक्के), दुसरी- रिया बिहाणी (91.07 टक्के), तीसरा- महेन मुनोत, साक्षी चोरडिया (89.84 टक्के), चौथी- श्रेया गांधी (89.69 टक्के), पाचवा- अनुज गांधी (89.07 टक्के) येण्याचा बहुमान पटकाविला.
या यशाबद्दल विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य संतोष कुलकर्णी, पर्यवेक्षक संजय पडोळे, रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य यांनी अभिनंदन केले.





