भाऊबीज म्हणजे बहिण-भावाच्या अतूट नात्याचा उत्सव. मात्र आजकाल नाती सेलिब्रेट करणारा कोणताही सण-उत्सव आला की पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे गिफ्ट काय द्यायचं? सर्व गोष्टींची किंमत पैशांमध्ये करण्याची सवय लागलेले अनेक जण महागड्या वस्तू गिफ्ट देत सोशल मीडियावर मिरवतात. मात्र या महागड्या गिफ्ट पेक्षाही तुमच्या बहिणीसाठी अमूल्य ठरतील आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहील अशा काही खास आयडिया तुम्हाला या लेखातून सांगतोय खास भाऊबीजेनिमित्त…
१. तिच्यासोबत क्वालिटी टाइम घालवा
आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांकडेचं द्यायला कमी पडणारी गोष्ट म्हणजे आपला वेळ! भाऊबीजेच्या या दिवशी तुम्ही आपल्या बहिणीसोबत पूर्ण दिवस घालवा. एकत्र आवडता चित्रपट बघा, जुन्या आठवणींना उजाळा द्या, लहानपणीच्या गोष्टींवर हसून आनंद घ्या. तिच्यासोबत घालवलेले हे क्षण आयुष्यभर तिच्या हृदयात घर करतील.
२. स्वतःच्या हातांनी काही खास तयार करा
तुमच्या बहिणीसाठी काहीतरी हाताने बनवा. तिच्या आवडीचं कार्ड, एक छोटा फोटो अल्बम, किंवा तिच्या आवडीचा पदार्थ बनवा. तुमच्या या प्रयत्नातून तिच्यावरचं प्रेम आणि आदर व्यक्त होईल.
३. तिच्या आवडीचं सरप्राइज प्लॅन करा
तिच्या आवडीचं ठिकाण किंवा अॅक्टिव्हिटी शोधा. कदाचित तिला एखाद्या कॅफेमध्ये जायची इच्छा असेल किंवा कोणत्या प्रदर्शनाला भेट द्यायची असेल. तिच्यासाठी ते सरप्राइज प्लॅन करा. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य तुमच्यासाठी आणि तिच्यासाठीही सर्वात मोठी भेट असेल.
४. मनापासून पत्र लिहा
भावनांना व्यक्त करण्यासाठी शब्दांपेक्षा उत्तम काहीच नाही. बहिणीसाठी एक मनापासून पत्र लिहा. तिच्याबरोबरचे खास क्षण, तिचं कौतुक, आणि तिचं तुमच्या आयुष्यातील स्थान याबद्दल लिहा. हे पत्र तिच्यासाठी अमूल्य असेच ठरेल.
५. सोशल वर्कचा अनुभव घ्या
एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करा. एखाद्या अनाथाश्रमाला भेट द्या, वृद्धाश्रमात जाऊन वेळ घालवा किंवा पर्यावरणासाठी एखादा उपक्रम राबवा. या अनुभवातून तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि तुम्ही दोघंही आनंदी व्हाल.
शेवटी, प्रेम आणि वेळ हाच सर्वात मोठा खजिना!
भाऊबीजेला बहिणीला आनंदी करण्यासाठी महागड्या भेटींची गरज नाही हे तुम्हालाही आता पटलं असेलच! तिच्यासोबत घालवलेला वेळ, मनापासून व्यक्त केलेलं प्रेम आणि तिच्या आनंदासाठी केलेले छोटे प्रयत्न यामुळे ती नक्कीच खुश होईल. या भाऊबीजेला या टिप्स वापरून तिला नक्कीच स्पेशल वाटेल याची खात्री आहे!