मराठी – मराठी इंडस्ट्रीमध्ये विनोदी कलाकार, अभिनेता भाऊ कदम यांनी “चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून सर्वांना हसवले आहे. भाऊ कदम यांनी लोकांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. “चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भाऊंची कॉमेडी टायमिंग प्रत्येकाला हसवतेच, अशात भाऊंची लेकही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. भाऊंची लेक मृण्मयी कदमदेखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.
मृण्मयीनेहमीच तिचे मत आणि लाईफचे अपडेट सोशल मीडियावर फॅशन सोबत शेअर करत असते. ती सोशल मीडियावर फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित विषयाच्या माहितीचे व्हिडिओ सोशलवर शेअर करत असते. अशात तिने मुलाखतीत एका खास सावळ्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांविषयी भाष्य केलं आहे.
मृण्मयी मुलाखतीत रंगाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, ‘मी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तेव्हा हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही. कारण लहानपणी कुटुंबामध्ये मला अशी वागणूक कधीच मिळाली नाही. कारण आमच्या घरात सर्वच डस्की स्किनचे टोन आहे. त्यामुळे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरु केलं तेव्हा यावरून मला काही ऐकावं लागेल असा विचार माझ्या डोक्यात नव्हता.’ ती पुढे म्हणाली,’मात्र माझ्या रंगाबाबत लोक इतका का विचार करतात हे मला समजतच नव्हतं. सोशलवर युजर्स मला विचारायचे असा स्किन टोन असून तुला इतका आत्मविश्वास कसा आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या गोऱ्या मुलीला तुम्ही असं विचाराल का तुला इतका आत्मविश्वास कसा?’ असं म्हणत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.