‘भाटघर’ सुरक्षित; पण, दुरुस्ती गरजेचीच

‘पाटबंधारे’चा निर्वाळा; गळतीवर विविध सूचना

भोर – भाटघर धरणाला सध्या कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र, नाशिक येथील मध्यवर्ती धरण सुरक्षितता संघटनेकडे संकल्पचित्राद्वारे अभ्यास करून धरणाच्या गळतीवर उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पाटबंधारे विभागाने केल्या आहेत.

भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्राजवळील दगडी भिंतीतून पाणी गळती होत असल्याचे दोन वर्षांपासून निदर्शनास येत असल्याने याची तांत्रिक पाहणी करून त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत पुणे पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या पथकाने धरणाची पाहणी केली.

भाटघर धरणाचे बांधकाम ब्रिटिशकालीन असून धरणाच्या सा.क्र.696.00 मी. ते 753.23 मी. या भागात भिंतीतून निघणाऱ्या पेनस्टॉक एअर हॅट पाइपमधून (वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी घेऊन जाणाऱ्या पाइपला) पाणीगळती होत आहे. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता चौधरी यांनी भाटघर धरणाला भेट दिली. तसेच, धरणाची तांत्रिक तपासणीही केली. यानुसार भाटघर धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.