Bhaskar Jadhav on Shiv Sena । आपल्या स्पष्ट वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ज्येष्ठ नेते भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिला. चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी “शिवसेनेची आता जवळ जवळ काँग्रेसच झाली आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत” असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी मांडले आहे. त्यांची बैठकीतील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे आता शिवसेनेची वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसत आहे.
चिपळूणमध्ये शिवसरेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर अनेक आरोप केले आहेत. यावेळी बोलताना, “जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं” असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांची तीव्र नाराजी व्यक्त केली. शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी मंचावर सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हेदेखील उपस्थित होते.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेते विनायक राऊतांनी जाधवांचा मुद्दा योग्य होता असे म्हणत पक्षातील भोंगळ कारभारावर बोट ठेवले. तर भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर पक्ष अडचणीत असताना थोडं संयमानं घेण्याची सूचना संजय राऊतांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाची भास्कर जाधवांना खुली ऑफर Bhaskar Jadhav on Shiv Sena ।
एकीकडे दोन्ही राऊत बाजू सावरत असताना दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र भास्कर जाधवांना शिंदे गटात येण्यासाठी खुली ऑफरच देऊन टाकली. भास्कर जाधव सिनियर नेते आहेत. भास्कर जाधवांना शिवसेनेत घ्यायचं की नाही हा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण मी सांगतो ते खूप मोठे नेते आहेत. आम्हाला ते आमच्या पक्षात आले तर आवडेल असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? Bhaskar Jadhav on Shiv Sena ।
गेल्या काही दिवसात शिवसेनेत धूसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रत्नागिरीच्या राजापूरमधील राजन साळवींच्या नाराजीची चर्चा असो, किंवा मग महाविकास आघाडी सोडून स्वबळाची भाषा करणारी वक्तव्यं असोत. त्यामुळे आता शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत आता उद्धव ठाकरे सेनेचे काय होणार हा प्रश्न आपसूक चर्चेत येतोच. अशातच आता आता पक्षातूनच नाराजांनी सूर काढल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे हे पाहणे गरजेचे आहे.