मुंबई – कॉमेडी क्वीन भारती सिंह ऑनस्क्रीन असो अथवा ऑफस्क्रीन असो, आपल्या फॅन्सना हसवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तिने एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो बघून सगळेच हसायला लागतात. इन्स्टाग्रामवरच्या या व्हिडिओमध्ये भारती सिंह एका झोपाळ्यावर बसलेली आहे.
View this post on Instagram
हा झोपाळा एका झाडाच्या फांदीला बांधला आहे. झोपाळ्यावर बसलेली भारती दंगामस्ती करते आहे. याच दरम्यान तिचा तोल जातो आणि ती धडामकन झोपाळ्यावरून खाली पडले. गमतीची गोष्ट ही की झोपाळ्यावरून पडल्यानंतरही ती हसत असते. सुदैवान झोपाळ्यावरून पडल्यानंतरही तिला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.
View this post on Instagram
“पडल्यानंतरही उठता आले पाहिजे,’ असे भारती सिंहने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर कंबर दुखावल्याचेही तिने म्हटले आहे. तिची ही कॉमेंट आणि स्वतःचीच फजिती दाखवणारा व्हिडिओ स्वतःहून फॅन्ससमोर आणण्याच्या तिच्या खिलाडूवृत्तीला पब्लिककडून खूप लाइक मिळत आहेत.