नवी दिल्ली – बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या बजाज फायनान्सने भारती एअरटेल बरोबर वित्तीय सेवांसाठी डिजिटल मंच निर्माण करण्यासाठी सहकार्य करार केला आहे. एअरटेलचे उपाध्यक्ष गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले की, एअरटेलचे सध्या 37 कोटी ग्राहक आहेत. 12 लाख वितरक आहेत. बजाज फायनान्स कंपनीकडे 27 वित्तीय उत्पादने आहेत तर 5,000 शाखा आहेत.
या सर्वाचा एकत्रित सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा सहकार्य करार केला आहे. यामुळे तळागाळापर्यंत वित्तीय उत्पादने पोहोचण्यास मदत होईल. बजाज फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन यांनी सांगितले की, यामुळे योग्य वित्तीय उत्पादने तळागाळापर्यंत पोहोचतील व सर्व समावेशक विकासाला चालना मिळू शकेल.