नवी दिल्ली: देशात सगळीकडे कोरोनाचे वातावरण आहे. मात्र या वातावरणामुळे निसर्गात अनेक चांगले बदल घडत यातून काही चांगल्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्याचेच एक उदाहरण सध्या मणिपूरमध्ये पाहायला मिळत आहे. इथल्या एका तरुणाने बांबूच्या झाडापासून अशा काही वस्तू बनवल्या आहेत त्याचा उपयोग गरम आणि थंड असे दोन्ही खाद्यपदार्थ साठवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याच्या या प्रयत्नामुळे त्याने प्लास्टिकच्या काही वस्तुंना सध्या कायमचा निरोप दिला आहे.
मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील लामका शहरात वास्तव्यास असणाऱ्या व्ही.जिन्खनपाऊ या तरुणाने बांबूचा असा सुंदर उपयोग केला आहे. जिन्खनपाऊ वयाच्या १० वर्षांपासून बांबूपासून उत्कृष्ट हस्तकलेतील वस्तू बनवण्याचे काम करत होता. लहानपणापासूनच बांबूची आवड असणाऱ्या जिन्खनपाऊने याचा काही तरी चांगला उपयोग करता येईल का या विचाराने यावर काम करण्यास सुरुवात केली. त्यातून त्याने सुरुवातील बांबू पासून पेन, फुले आणि काही आकर्षक वस्तू बनवल्या…मात्र यातही त्यांचे मन रमले नाही. त्यांना समाजासाठी उपयोगी असणाऱ्या काही वस्तू बनवायच्या होत्या. याविषयी जिन्खनपाऊ यांनी सांगितले कि, “यापूर्वी मी बांबूचे पेन, सजावटीचे तुकडे, बाटल्या, पेन ड्राईव्ह आणि स्वयंपाकघरातील विविध वस्तू बनवत असे, परंतु मला असे काहीतरी बनवायचे होते जे लोकांसाठी अद्वितीय आणि उपयोगी असेल. असे काहीतरी जे मोहक दिसत असेल आणि कार्यशील देखील असेल. त्यातून मी सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक असणारा टिफिन बॉक्स तयार केला. त्याच्या आकर्षक डिझाईनसह आम्ही सर्वांसमोर आलो, ” असे त्यांनी सांगितले.
बांबूपासून तयार करण्यात आलेला टिफिन बॉक्स हा पारंपारिक स्टील टिफिन डब्बाप्रमाणेच तीन डब्ब्यांच्या डिझाईनमध्ये तयार करण्यात आला आहे. यासोबतच या आकर्षक प्लेसहोल्डरसह येतो जो गळती रोखण्यापासून रोखणार्या प्रत्येक भागाला कडकपणे लॉक करतो. आत्तापर्यंत, या टिफिन बॉक्सचे दोन प्रकार तयार करण्यात आले आहेत, एक कोरडे अन्न साठवण्याकरिता आणि दुसरे ग्रेव्ही, करी आणि डाळ सारख्या ओल्या अन्नासाठी.
उत्पादनाच्या टिकाऊपणाबद्दल बोलताना जिन्चनपाऊ यांनी, “ही उत्पादने कमीतकमी तीन वर्ष टिकतात. ते चांगल्या प्रतीची बांबूची सामग्री वापरुन तयार केले गेले आहेत आणि गरम आणि थंड दोन्ही पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच, आम्ही डिझाइनमध्ये सातत्याने सुधारणा करीत आहोत आणि त्यासाठी टिफीनच्या आत तांबे आणि स्टीलचा आंतरिक अस्तर समाविष्ट करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, “बांबू हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आम्ही हे सर्वत्र आणि सर्व गोष्टींमध्ये पाहतो – याचा उपयोग घरगुती वस्तू तयार करण्यासाठी, कुंपण घालण्यासाठी आणि घरे बांधण्यासाठी केला जातो. मी दहा वर्षांचा होतो तेंव्हापासून यावर काम करतोय त्यामुळे याचा आपल्या आयुष्यात किती महत्व आहे माहिती आहे.
सध्या जिन्खनपाऊ आपला मित्र आणि व्यावसायिक भागीदार गोलन सुंजामंग नौलाक यांच्यासह मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील लामका शहरात झोगम बांबू वर्क्स (झेडबीडब्ल्यू) नावाचा एक इको-फ्रेंडली हस्तकला उपक्रम चालवतात. त्यांच्या या उपक्रमातून अनेक इको-फ्रेंडली वस्तू निर्मिती करण्यात येते यामध्ये बांबूचे पेन, सजावटीचे तुकडे, बाटल्या, पेन ड्राईव्ह आणि स्वयंपाकघरातील विविध वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, जिन्खनपाऊ आणि त्यांच्या मित्राने बनवलेला हा बांबूपासुनचा टिफिन बॉक्स सर्वसामान्यांना परवडण्यासारखा आहे. त्यामुळे शोभेच्या वस्तू व्यतिरिक्त बांबूचा उपयोग असा देखील होऊ शकतो हे निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट असल्याचे दिसत आहे.