पुणे: सिम्पल स्टेप्स यांच्या वतीने पाचव्या किड्स (लहान मुलांच्या) मॅरेथॉन स्पर्धेत 7 किमी मुलांच्या गटात भार्गव बरफ व मुलींच्या गटात अनन्या विजय यांनी तर 5 किमी मुलांच्या गटात अवनिश मुळे व मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी फडतरे यांनी अव्वल क्रमांक पटकवत विजेतेपद संपादन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 1750 धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचा फ्लॅग ऑफ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमरकर व निवृत एसीपी सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
7 किमी शर्यतीत मुलांच्या गटात भार्गव वरफने 29ः6 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर आकाश साळुंखेने 29ः59 सेकंद व करण वाघने 30ः42 सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात अनन्या विजयने 32ः42 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर रमा टोनपेने 33ः09 सेकंद व हरीका खत्तीने 33ः10 सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
5 किमी शर्यतीत मुलांच्या गटात अवनिश मुळेने 23ः06 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर शौर्य कुलकर्णीने 24ः22 सेकंद व राम मगदूमने 24ः46 सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी फडतरेने 23ः12 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर हरिणी व्ही. हीने 29ः01सेकंद व मोक्षदा चौधरीने 32ः23सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील अव्वल तीन स्पर्धकांना पदक व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात आली. तर शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जम्पस्टार्टचे आदित्य व स्नेहा तापडीया, आदर पुनावाला, क्लिन सिटी उपक्रमाचे मल्हार करवंदे व सिम्पल स्टेप्सचे संस्थापक आशिष कसोदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.