कोटा – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून पुन्हा सुुरू झाली. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वढेरा हेही या यात्रेत सहभागी झाले होते.
चल रहे हैं हिंद को बचाने के लिए…
आज #BharatJodoYatra में कांग्रेस महासचिव @priyankagandhi जी शामिल हुईं। pic.twitter.com/F7jjnh8G2n
— Congress (@INCIndia) December 12, 2022
बुंदी जिल्ह्यातील बबई येथील तेजाजी महाराज मंडईपासून सकाळी सहाच्या निघालेल्या या यात्रेला आज नारी शक्ती पदयात्रा असे संबोधले गेले. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
यात्रेला अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लोकांमध्येही महिलांचे प्रमाण लक्षणीय होते.गेले सात दिवस ही यात्रा राजस्थानातून प्रवास करीत आहे. 21 डिसेंबरला ही यात्रा हरियाणात प्रवेश करणार आहे.