अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या कालच्या बैठकीमध्ये अरुणाचल आणि सिक्कीम येथील विधानसभा निवडणुकांसाठीच्या १८ उमेदवारांच्या नावांवर शिक्कमोर्तब झाली आहे. आज भारतीय जनता पक्षातर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या दोन राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या १८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीमध्ये अरुणाचल प्रदेशातील ६ उमेदवारांची नावे असून उर्वरित १२ नावे ही सिक्कीम विधानसभा उमेदवारांची आहे.

दरम्यान आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित होणार असल्याने या चार राज्यांमध्ये निवडणुकीची जोरदार धामधूम सुरु आहे.

https://twitter.com/ANI/status/1108662496359931905

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)