नवी दिल्ली – कर्नाटकात काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांमध्येही संतापाचे वातावरण आहे. आपल्या पक्षाच्या सरकारच्या विरोधात निदर्शने केली जात असून काही कार्यकर्त्यांनी तर गृहमंत्र्यांच्या बंगल्यात घुसुन निदर्शने केली. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकला भेट देऊन सगळ्याच वरिष्ठ नेत्यांची झाडाझडती घेतली.
शहांनी गुरूवारी कर्नाटकचा दौरा केला. यात त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली. नेत्तारूच्या हत्येनंतर पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये जो आक्रोश आहे त्यावर त्यांनी चर्चा केल्याचे समजते आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपला अशा स्थितीचा पहिल्यांदाच सामना करावा लागतो आहे. त्यांच्याच कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.
त्यावरून त्यांचेच कार्यकर्ते आणि काही हिंदुत्ववादी संघटना सरकारवर प्रचंड चिडल्या आहेत. त्यांनी सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया आणि त्याच्याशी निगडीत अन्य संघटनांवर बंदी घालण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्याकडे केली आहे. दोषींविरूध्द कठोर कारवाईची मागणी करत अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा दिला आहे.
रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर; शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी
कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्यात यश आलेले नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे मॉडेल स्विकारू असेही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून सांगण्यात आले. मात्र त्याचीही वातावरण निवळण्यास मदत झालेली नाही.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघात खेळाडूंनाही मिळणार ‘हा’ अधिकार