भारतरत्न म्हणजे ब्राह्मणांचा क्लब : ओवेसी

नवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारीका यांचा समावेश आहे.मात्र भाजप सरकारने भारतरत्न पुरस्काराचे राजकारण केल्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे. यातच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला असून भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचे वादग्रस्त विधान ओवेसी यांनी म्हटले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी यापूर्वीही भारतरत्नवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. पुरस्काराची सुरवात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 ला केली. त्यानंतर किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केले. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)