पुणे : पुण्यात मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणूका मोठ्या जोशात सुरू आहेत. सर्वच मिरवणूकांमध्ये सामाजिक संदेश देण्यात येत आहेत तर काहींनी देखावे सादर केले आहेत. त्यातच आता मानाच्या गणपती विसर्जनानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. मोदी गणपती मंदिराजवळील भरत मित्र मंडळ गणपती विसर्जनाची तयारी जोरात चालू आहे. या मंडळाची मिरवणूक सायंकाळी सात वाजता सुरू होईल असे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी सांगितले.