Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आज इंडिया आघाडीची आज भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. । Bharat Jodo Nyay Yatra
या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले आहे. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.
यावेळी सभेला संभोधित करताना सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले, “गेल्यावर्षी आम्ही कन्याकुमारीपासून यात्रेची सुरुवात केली. आम्हाला यात्रा करावी लागली.
मी काही वर्षांपूर्वी याचा विचारही केला नसता. सोशल मीडिया, मीडिया हे देशाच्या हातात नाही. हिंसा, महागाई, तरुणांच्या समस्या हे मुद्दे मीडियात पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली, कारण दुसरा कोणताही उपाय नव्हता. असं ते म्हणाले.
मी एकट्याने ही यात्रा केली नाही. फक्त एकट्या राहुल गांधींनी ही यात्रा केली, अशा समजात राहू नका. कारण उद्धव ठाकरे, शरद पवार, तेजस्वी यादव हे देखील या यात्रेत सहभागी झालो. असं राहुल गांधी म्हणाले.
“आम्ही मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात लढत नाही. हिंदू धर्मात एक विशिष्ट शक्ती असते, त्या शक्तीविरुद्ध आम्ही लढत आहोत. काही वेळापूर्वी कोणीतरी म्हटले की राजाचा जीव ईव्हीएममध्ये अडकलाय.
ईडी, इन्कम टॅक्स, ईव्हीएम यांचा धाक राजकीय नेत्यांना दाखवला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक हे भीतीमुळे पक्ष सोडून गेलेत. जेलची भीती दाखवून घाबरवलं जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
‘या’ कारणामुळे अखिलेश यादव गैरहजर ! Bharat Jodo Nyay Yatra
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतंच एक पत्रक जाहीर केले आहे. यात त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोपाला न येण्याचे कारण सांगितले आहे.
“येत्या 20 मार्चपासून उत्तरप्रदेशात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे मी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही”, असे अखिलेश यादव यांनी म्हटले.
“इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही’ – मेहबुबा मुफ्ती
इंडिया झुकेगा नही, इंडिया रुकेगा नही, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 2014 च्या निवडणुकीत 15 लाख अकाऊंटमध्ये येणार सांगून भाजपने मते मागितली, पण असं काही केलं नाही. 2019 च्या निवडणुकीत पुलवामा शहीदांच्या नावाने मते मागितली आणि काहीही केलं नाही, असं म्हणून मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये…” – शरद पवार
“भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. देशाची ताकद ज्या लोकांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केलाय. तुम्हाला त्यांच्याकरून आश्वन दिलं जातील, पण तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला खूप आश्वसने दिली गेली आहेत. याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होतं. पण आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
सभेला दिग्गज नेत्यांची हजेरी –
मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन,
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.