राष्ट्रवादीचे भरत भोर विजयी 

अकोले – अकोले तालुक्‍यातील आंबड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते भरत भागवत भोर यांचा 95 मतांनी दणदणीत विजय झाला. मागील वर्षी उपसरपंच बाळचंद भोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत एकूण तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार दगडू बाळू जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना माघारीच्या दिवशी अपक्ष उमेदवार लता माधव जाधव यांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे निवडणूक दुरंगी झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या दृष्टीने ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. अखेर राष्ट्रवादी ने आपला गड राखण्यात यश मिळवले. राष्ट्रवादीचे भोर यांना 402, तर शिवसेनेचे जाधव यांना 307, जाधव यांना 14, तर नोटाला सात, मते मिळाली.

एकूण 730 मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, रमाजी कानवडे, अजाबा कानवडे, दामू जाधव, मुरलीधर जाधव, जयवंतराव जाधव, सरपंच रोहिदास जाधव, भागवतराव भोर, रमेश जाधव, कैलास कानवडे, संजय भोर, सुधीर कानवडे, शिवराम भोर, मधुकर भोर, मोतिलाल भोर, बबन भोर, संपतराव जाधव, भास्कर कानवडे, विष्णू भोर व तरुणांनी परिश्रम घेतले. माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.