-->

भंडारा अग्नितांडव : ‘त्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही’

निलेश राणेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई – भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेण्याबरोबरच घटनेच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले कि, भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही हे लक्षात आले. त्यानंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

दरम्यान, भंडारा घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भंडारा दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.