सातारा – 2021 साली राज्य शासनाने जाहीर केलेल्या व काही कारणाने रखडल्याने 2023 झालेल्या सातारा पोलीस भरतीत दोन उमेदवारांकडून कागदपत्रांची हेराफेरी झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये खासकरून विदर्भातील एकाचा तर पालघर जिल्ह्यातील एका तरुणाचा समावेश आहे. या उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असल्याचा तसेच जातीचा दाखला बनावट देत पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केल्याने भावी पोलिसांच्या भरतीला भामटेगिरिचा आधार असल्याचे चित्र आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, 2021 या वर्षातील पण काही कारणास्तव रखडलेली पोलीस भरती गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य शासनाच्या आदेशाने सातारा जिल्ह्यात 145 रिक्त पदाची पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर या भरती प्रक्रियेला मुहूर्त स्वरुप एप्रिल 2023 मध्ये आले होते. नमूद 145 पदांमध्ये विविध जाती-जमाती,प्रकल्पग्रस्त यांना काही जागा ठेवण्यात आल्या होत्या. भरती दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील एकाने प्रकल्पग्रस्त असल्याचा खोटा दाखला दिला आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील एकाने जातीचा बनावट दाखला देऊन राज्य शासनाची फसवणूक केली आहे. पोलीस खात्यात नोकरी मिळवून चुकीचे काम करणाऱ्या लोकांना आळा घालण्याची स्वप्न पाहणारे साताऱ्यातील भावी पोलीसच भामटे निघाले निघाले असून त्यांनी शासनाची फसवणूक तर केलीच पण इतर विद्यार्थी यांच्यावर अन्याय देखील केल्याने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पोलीस काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
निनावी अर्ज आणि पोलखोल
सातारा पोलीस भरती झाल्यानंतर त्यामध्ये यशस्वी झालेल्या यवतमाळ येथील ‘त्या’ तरुणाने असा प्रकार केल्याची माहिती असलेल्या एकाने सातारा पोलिसांना निनावी अर्ज पाठवून याबाबत दखल घेण्यास विनंती केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
पोलीस मुळाशी जाणार का?
बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचा सातारा जिल्ह्यात हा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे असे उमेदवार आणि त्यांना बोगस कागदपत्रे बनवून देणार्या रॅकेटच्या मुळाशी सातारा पोलीस जाणार का? तसे केले तरच प्रामाणिक प्रयत्न करण्याऱ्या तरुणांना न्याय मिळणार आहे.