राज्य नेमबाजी स्पर्धेत भक्‍ती खामकरला सुवर्ण

मुंबई: महाराष्ट्राची अव्वल नेमबाज भक्‍ती खामकरने राज्य नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर प्रोन प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावताना दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.

तिने महिला तसेच ज्युनियर गटात ही सुवर्णपदके जिंकली. मुंबई शहरच्या या खेळाडूने 600 पैकी 594 गुणांची कमाई केली. पुरुष गटातील विजेत्या खेळाडूच्या गुणांशीही तिने बरोबरी केली. वरळी येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरच्या इंद्रजीत मोहितेने 594 गुणांसह विजेतेपद पटकाविले.

निकाल ः

50 मीटर प्रोन (महिला) : 1) भक्‍ती खामकर (मुंबई शहर; 594), 2) राखी सामंत (मुंबई शहर; 583), 3) स्नेहल पाटील (पुणे; 583). 50 मीटर प्रोन (ज्युनियर) : 1) भक्‍ती खामकर (मुंबई शहर; 594), 2) प्रणाली सूर्यवंशी (पुणे; 574), 3) याशिका शिंदे (मुंबई शहर; 573). 50 मीटर प्रोन (पुरुष) : 1) इंद्रजीत मोहिते (कोल्हापूर; 594), 2) पुष्कराज इंगोले (रत्नागिरी; 587), 3) विश्वजित शिंदे (मुंबई शहर; 583).

25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल प्रकारात पुण्याचा विक्रांत घैसासने सुवर्णवेध घेतला. या गटात रोनक पंडित आणि 14 वर्षीय हर्षवर्धन यादव यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझपदके जिंकली. 25 मीटर रॅपिड फायरमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या हर्षवर्धनने स्टॅंडर्ड प्रकारातही ज्युनियर गटात सुवर्ण जिंकले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.