‘चलो बुलावा आया है’ फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन; पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली – ‘चलो बुलावा आया है’ फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल (वय, 80) यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संगित प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झाले’, असा आशयाचे ट्विट करत गायक दलेर मेहेंदी यांनी नरेंद्र चंचल यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र चंचल यांचे बाॅलिवूडमधील करिअर अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत सुरू झाले होते. त्यांनी बाॅलिवूडमधील अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत. त्यांना ‘अवतार’ चित्रपटातील ‘चलो बुलावा आया है’ या गाण्याने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसवर एक गाणे गायले होते. सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल झाले होते. नरेंद्र चंचल यांच्या निधनाबद्दल संगित क्षेत्रासह बाॅलिवूडमधील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.