पुणे – एका मराठी चित्रपटातील भाईचा बड्डे गाण्यातील केक कापण्याच्या सीननंतर सर्वत्र तलवार आणी कोयत्याने केक कापण्याचे फॅड निर्माण झाले आहे. शहरातील काही तथाकथीत भाई भर रस्त्यात तलवार किंवा कोयत्याने केक कापताना दिसतात. यांच्यावर आजवर कारवाई करण्यात आल्यानंतरही असे प्रकार कमी होताना दिसत नाही. असाच एक प्रकार आयबीएम रस्त्यावर शनिवारी सायंकाळी घडली.
भर रस्त्यात कोयत्याने केक कापणाऱ्या पाच जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अमरुषी शेलार(22,रा.सिध्दार्थनगर), कुणात प्रताप लोणकर(19,रा.पाडुरंग अळी), सोनु भिसे, रोहन कसबे आणी गणेश चराटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांषी नावे आहे. यातील अक्षय व कुणालला अटक करण्यात आली आहे. यांच्यावर अगोदर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा वाढदिवस साजरा होत असताना रस्त्याने जाणाऱ्या काहींनी याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. यातीलच एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे लक्षात येताच इतर तीघे पळून गेले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र, सोटे, बंदुका व शारीरीक इजा होईल असे हत्यार बाळगण्यास मनाई आहे. त्यांनी या आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.