मुंबई – सलमान खान हा बॉलीवूडमधील असा स्टार आहे, की ज्याच्यासाठी त्याचे फॅन्स आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी काहीही करायला तयार होत असतात. या फॅन्ससाठी सलमानचा सिनेमा रिलीज होणे म्हणजे एखादा सण-उत्सव असल्यासारखेच असते. पण सलमानचे हे फॅन असे काही उद्योग करतात की स्वतः सलमानदेखील वैतागत असेल.
सलमानचा “अंतिम’ जेथे रिलीज झाला आहे अशा एका थिएटरमध्ये सिनेमा सुरू असताना सलमानची एन्ट्री झाल्यावर प्रेक्षक फटाके वाजवत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आणखीन एक व्हिडीओ पुढे आला आहे त्यात सलमानचे फॅन्स ढोल ताशे वाजवत अंतिम बघायला निघालेले आहेत.
View this post on Instagram
आणखीन एक असाच भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये सलमानचे फॅन्स “अंतिम’च्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सलमान चांगलाच भडकला आहे.
एकीकडे लोकांना प्यायला पाणीही मिळत नाही आणि तुम्ही दूध वाया घालवता आहात. दूध वाया घालवू नका. जर दुधाचा वापरच करायचा असेल, तर ते गरीबांच्या मुलांना वाटून टाका.असा सल्ला सलमानने आपल्या फॅन्सला दिला आहे.