मुंबई : काँग्रेसचे नेते भाई जगताप हे सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहेत. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आता या प्रकरणात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनीदेखील उडी घेतली आहे. भाई जगताप विषयी एक ट्विट करून त्यांनी निशाणा साधला आहे. भाई जगताप हे टपोरी असल्याची सडकून टीका निलेश राणे यांनी केली आहे.
भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2021
“भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं,” असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. दरम्यान, यापूर्वी अमृता फडणवीस यांनी देखील भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत जगताप यांचा चांगलाच समाचार घेतला होता.