मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. भाग्यश्री सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
भाग्यश्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात तिच्या ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. भाग्यश्री सध्या या फोटोमुळे सोशलवर चर्चेत आली आहे.
हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये भाग्यश्री खूपच स्टायलीश आणि तिचा अंदाज एकदम हटके असल्याचा दिसून येत आहे.
भाग्यश्रीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. भाग्यश्रीने एका मालिकेपासून तिच्या करियरला सुरुवात केली होती. सध्या तिच्या फोटो शूटमुळे ती सोशलवर प्रचंड गाजली आहेत.