नवी दिल्ली – दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुक 2022 मध्ये पक्षाचे खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उभे करण्याचे ठरवले आहे.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाच्या औपचारिक घोषणेसाठी पक्ष योग्य वेळेची वाट पाहत आहे. सध्या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करोना पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे औपचारिक घोषणेसाठी काही दिवसांचा विलंब होऊ शकतो.