चंदीगड :– पंजाब सरकारने ‘सीएम दी योगशाला’ या कार्यक्रमांतर्गत लोकांना मोफत योगाचे वर्ग उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. सुरूवातीला ते चार शहरांमध्ये सुरू होतील असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. असा योग शिक्षणाचा वर्ग आपच्या दिल्ली सरकारने सुरू केला होता. पण त्यालाही दिल्लीच्या नायब राज्यपालांनी आडकाठी करून तो वर्ग बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी अमृतसर, लुधियाना, फगवाडा आणि पटियाला यांची निवड करण्यात आली आहे.
ਪੰਜਾਬ ਸਰਕਾਰ ਦਾ ਨਵਾਂ ਉਪਰਾਲਾ, ਸੀ. ਐਮ. ਦੀ ਯੋਗਸ਼ਾਲਾ… ਆਓ ਪੰਜਾਬੀਓ ਪੰਜਾਬ ਨੂੰ ਤੰਦਰੁਸਤ-ਸਿਹਤਮੰਦ ਤੇ ਹੱਸਦਾ ਵੱਸਦਾ ਪੰਜਾਬ ਬਣਾਈਏ…Live https://t.co/8rog7z9870
— Bhagwant Mann (@BhagwantMann) April 3, 2023
मान यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, “योग हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. तो आपल्या देशाच्या वारशाचा भाग आहे, परंतु आजकाल आपण ते विसरत चाललो आहोत. मीही रोज सकाळी योगासने करतो. त्याचे अनेक फायदे आहेत. पण आपल्या व्यस्त जीवनातून योग नाहीसा झाला आहे. योगाला पुन्हा एकदा सार्वजनिक मोहीम बनवण्याची गरज आहे. योगाचे हे वर्ग मोफत असतील. त्यासाठी सरकारकडून योग प्रशिक्षक पाठवले जातील.