Border–Gavaskar Trophy 2024(Rohit Sharma) : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबतही त्याने मोठे संकेत दिले आहेत.टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाचा हा लाजिरवाणा पराभव होता. या सामन्यानंतर रोहित शर्माबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलं आहे.
एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. हा सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना खूप महत्त्वाचा असेल.तसेच टीम इंडियाच्या पराभवाची जबाबदारी स्वतः रोहित शर्माने घेतली आहे. त्याने मुंबई कसोटीनंतर सांगितले की, कर्णधारपदासह मला चांगली फलंदाजी करता आली नाही.
इकॉनॉमिक टाईम्समधील एका बातमीनुसार, रोहितने पर्थ कसोटीत खेळण्याबाबतही शंका व्यक्त केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.वृत्तानुसार, रोहित म्हणाला, “मी पर्थ कसोटीत खेळणार की नाही हे मी आताच सांगू शकत नाही.” त्यामुळे रोहित कसोटी टीम इंडियामधून ब्रेक घेण्याची शक्यता आहे.
मुंबई कसोटीत न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने 18 धावा केल्या होत्या. यानंतर तो बाद झाला. दुसऱ्या डावात तो केवळ 11 धावा करून बाद झाला. संपूर्ण मालिकेत रोहितची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याला 3 सामन्यात केवळ 91 धावा करता आल्या.
दरम्यान,भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे.टीम इंडिया 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरी कसोटी खेळणार आहे. यानंतर तिसरी कसोटी ब्रिस्बेनमध्ये तर चौथी कसोटी मेलबर्नमध्ये खेळवली जाईल. या मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे.