अनाहूत मेसेजपासून सावध राहा

शेअरबाजारांची गुंतवणूकदारांना सूचना

मुंबई – विविध बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही अनाहूत मेसेज येत आहेत. अशा मेसेजपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे, अशी सूचना राष्ट्रीय आणि मुंबई शेअरबाजाराने गुंतवणूकदारांना केली आहे.

हे मेसेज नोंदलेल्या कंपन्यांच्या संदर्भात येत असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून मिळत आहे. माहिती पसरविण्यासाठी व्हॉट्‌सऍपचा वापर केला जात आहे. गुंतवणूकदारांनी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराकडे ई- मेलद्वारा विचारणा केली असता अशा मेसेजपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे अनाहूत मेसेज कोण पाठवत आहे, त्यामागे काय दृष्टिकोन आहे यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी मेसेजवर प्रथमदर्शनी विश्‍वास ठेवू नये, अशी सूचना शेअरबाजारांनी गुंतवणूकदारांना केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.