लंडन – माजी कर्णधार राहुल द्रविड येत्या काळात भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार असल्याची बातमी समोर येताच अनेक संघांनी जणू धसकाच घेतला आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणारी मालिका त्याच्या प्रशिक्षणातील पहिलीच मालिका असेल. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ येत्या काळात आणखी भक्कम होणार आहे.
त्यामुळे भारतीय संघ जागतिक क्रिकेटवरची पकड आणखी मजबूत करेल, असा इशाराही इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने अन्य देशांना दिला आहे.