बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असून काल दिवसभरात 37 जणांना कोरोणाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीकरांची चिंता वाढली आहे.शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काल दिवसभरात बारामती शहर व तालुक्यातील शासकीय व खासगी प्रयोगशाळेत 151 जणांची नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 37 जण कोरोना संक्रमित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. शहरात 26 तर तालुक्यात 11 रुग्ण आढळून आले आहेत. शासकीय नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.