लंडन – कार्यालयात किंवा समाजात वावरताना कमी केस असलेल्या किंवा अजिबात केस नसणाऱ्या लोकांची त्यांच्या टकलेपणावरून नेहमी चेष्टा केली जाते. पण आता ब्रिटनमध्ये हा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्यात आला आहे. जर टकलेपणावरून कार्यालयात चेष्टा झाली तर त्याचा समावेश गुन्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच लैंगिक शोषण विरोधी कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे.
ब्रिटनमधील रोजगार लवादाने अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. नेहमीच्या न्यायालयाने या लवादाकडे हा विषय पाठवला असता लवादाने अशा प्रकारे टकलेपणावरून चेष्टा करणे लैंगिक शोषणाचा गुन्हा ठरू शकतो असे म्हटले आहे. वेस्ट यॉर्कशायरमधील ब्रिटिश बंग या कंपनीतील टोनी फिन या नावाच्या व्यक्तीने याबाबत दावा दाखल केला होता. आणि कंपनीच्या कार्यालयामध्ये आपले लैंगिक शोषण होत असल्याचे आरोप त्याने केले होते.
स्पष्टीकरण करताना त्याने आपल्या टकले पणावरून आपली मोठ्या प्रमाणात चेष्टा होत असल्याने तो लैंगिक शोषणाचा चे प्रकार आहे असा दावा त्याने केला होता. या कंपनीत 24 वर्ष इलेक्ट्रिशन या पदावर कार्यरत असणाऱ्या टोनी फिनला गेल्या वर्षी कंपनीने कामावरून काढून टाकले होते. त्याने या कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला असून माझे काम कामकाज सुरू असताना टकलेपणावरून चेष्टा होऊन माझे लैंगिक शोषण झाले आहे असा दावा त्यांनी केला आहे.
टकलेपणावरून ज्यांची चेष्टा केली जाते त्यांच्या मनात एक प्रकारे भेदभावाची भावना निर्माण होते आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे त्यांना वाटू लागते. म्हणूनच अशा प्रकारे चेष्टा करणे हे लैंगिक शोषण ठरू शकते असे न्यायालय लवादाने म्हटले आहे. या प्रकरणाबद्दल टोनी फीन याला किती नुकसान भरपाई द्यायची याचा निर्णय येत्या काही आठवड्यात हे न्यायालय करणार आहे पण सध्या मात्र ब्रिटनमध्ये या खटल्याच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.