दोन गटातील भांडणात कोयत्याने वार 

पिंपरीत मध्यरात्री राडा : 17 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी  – किरकोळ कारणावरुन दोन गटात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या तुफान भांडणात एकमेंकावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि.16) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पिपंरी येथील बौध्द नगर कमानीजवळ घडली. याप्रकरणात अमोल बबन घोडके (वय-30 रा. बौध्द नगर, पिंपरी) व सुभाष बाबुराव तुरुकमारे (वय-28 रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी परस्परविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन्ही गटातील 17 जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल बबन घोडके याने दिलेल्या फिर्यादीवरुन, आरोपी किशोर तुरुकमारे, सुभाष तुरुकमारे, आनंद तुरुकमारे, पंडित तुरुकुमारे, सनी सोनवणे, राकेश साळवे, आकाश राजपूत, सनी सरवदे हे रात्री दीड वाजताच्या सुमारास बौध्द नगर कमानीजवळ आले होते. फिर्यादी याचा भाऊ आकाश बबन घोडके याला आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन मारहाण करण्यास सुरूवात केली. फिर्यादी अमोल भांडणे सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी अमोल यांना मारहाण करुन जखमी केले. आकाश याच्यावर कोयत्याने वार केले.

किशोर तुरुकमारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर तुकमारे हा बौध्दनगर कमानीजवळ थांबला असता आरोपी आकाश बबन घोडके याने त्याच्यासमोर बिअरच्या बाटल्या फोडल्या. याबाबत त्याला विचारणा केली असता “तु काय भाई लागून गेला का?, तू मला विचारणारा कोण?’ असे म्हणून फिर्यादी किशोर याच्या डोक्‍यात कोयत्याने वार केला. त्याचे साथीदार बंटी बशर भूमकर, सागर प्रभाकर शिंदे, प्रमोद दत्तात्रय साबळे, ऋषिकेश गिताराम तुरुकमारे, लखन उर्फ अमोल बबन घोडके व इतर तीन जणांनी येवून कोयत्याने वार करुन किशोर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.