21 राज्यांमधील करोनाग्रस्त बरे होण्याचा दर अधिक चांगला

नवी दिल्ली: देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील करोना रूग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय दरापेक्षा अधिक चांगला आहे असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. रूग्ण बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण 60.77 टक्के इतके आहे.

देशातील करोना उपचारासाठी केंद्र सरकार विविध राज्यांच्या मदतीने काम करीत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत असे म्हटले आहे. करोनाग्रस्त रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 64 हजार 268 ने जास्त आहे असेही या मंत्रालयाने म्हटले आहे.

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चंदीगड 85.9, लडाख 82.2, उत्तराखंड 80.9 छत्तीसगड 80.6, राजस्तान 80.1, मिझोराम 79.3, त्रिुपरा 77.7 असे आहे. बिहार, हरियाना, गुजरात, पंजाब, दिल्ली, मेघालय इत्यादी राज्यांतील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.