मुंबई : येथील बेस्टच्या कंत्राटी कंपनीचे काम बंद आंदोलन सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी प्रतीक्षा नगर डेपो मध्ये एक बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. सलीम नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे. याविरोधात सोमवारी पहाटे पासून प्रतीक्षा नगर आणि धारावी डेपोमधील सीएनजी पंप बंद करून ठेवला आहे त्यामुळे एकही बस सोडण्यात आली नाही.
कामगार काम करण्यास तयार आहेत. मात्र, मॅनेजमेंट चे कोणी हजार नाहीत जबाबदारी घ्यायला. मारहाण होऊन ही प्रशासनाने मारहाण करणाऱ्यांवर काहीच कारवाई केली नाही म्हणून कामगार संतप्त झाले आहेत.
यामुळे या दोन डेपो मधून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या प्रवाशांचे सकाळी सकाळी हाल होत आहेत. काही वेळाने स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बेस्टने जबाबदारी घेवून प्रवाश्यांना सुविधा देवून हाल होण्यापासून वाचवावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.