Smart TV Offer: नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म Amazon वर अनेक स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहे. Amazon वरुन तुम्ही Xiaomi च्या स्मार्ट टीव्हीला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Redmi F Series UHD 4K Smart LED Fire TV
Redmi च्या या टीव्हीमध्ये 55 इंच अल्ट्रा HD डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. यामध्ये व्हिज्युअल एक्सपीरियन्ससाठी Vivid पिक्चर इंजिनचा सपोर्ट मिळतो. याशिवाय, यात प्राइम व्हीडिओ, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब अॅप्स देण्यात आले आहे. डिस्प्ले मिररिंग फीचरच्या मदतीने तुम्ही फोनला टीव्हीशी कनेक्ट करू शकता. या स्मार्ट टीव्हीची किंमत 33,999 रुपये आहे. यावर 2 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्हीला ईएमआयवरही खरेदी करता येईल.
Xiaomi X Series 4K Ultra HD Smart Google TV
Xiaomi च्या या 65 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत 46,999 रुपये आहे. यामध्ये 65 इंच 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देण्यात आला असून, 3840×2160 पिक्सल रेजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. शानदार ऑडिओ एक्सपीरियन्ससाठी Dolby Audio सपोर्ट दिला आहे. याशिवाय, बिल्ट-इन WiFi, गूगल क्रोमकास्ट आणि गूगल असिस्टेंट सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी तीन HDMI आणि दोन USB पोर्ट दिले आहेत.
Xiaomi A Pro 4K Dolby Vision Smart Google TV
Xiaomi चा स्मार्ट टीव्ही 43 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, रिझॉल्यूशन 3840×2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. टीव्ही HDR10, Dolby Vision आणि Vivid पिक्चर इंजिन सपोर्टसह येतो. स्मार्ट फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये गूगल टीव्ही, स्क्रीन मिररिंग, 2GB रॅम, 8GB स्टोरेज आणि OTT अॅप्सचा सपोर्ट मिळतो. टीव्हीवर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देत आहे. या टीव्हीची किंमत 23,999 रुपये असून, यावर 1,500 रुपये डिस्काउंटचा फायदा मिळतो.