#Foodiesकट्टा : येवा कोंकण आपलोच आसा 

मांसाहारी खवैय्यांची आवड लक्षात घेऊन अस्सल कोंकणी जेवणाचा आस्वाद देणारे “हॉटेल आस्वाद गोमंतक’ अल्पावधीतच असंख्य पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहे. उत्तम प्रतिसादामुळे हॉटेल जगतात एक आगळं-वेगळं स्थान निर्माण केलेल्या आस्वाद गोमंतकची बावधन, मराठा मंदिरामागे, एल.एम.डी. गार्डनजवळ नुकतीच नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. कोंकणी जेवण आणि खास ताजे मासे यांच्या पाककृतींमुळे येथील मेजवानी खवैय्यांसाठी पर्वणी ठरत आहे.

दरवर्षी प्रमाणेच यंदा देखील (15 जुलै ते 1 ऑगस्ट) या कालावधीत खास (आखाड महोत्सवाचे) हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले असल्याचे हॉटेलचे प्रोप्रायटर राजेश धारिया यांनी सांगितले. या महोत्सवाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे कडकनाथ कोंबडीचे विविध स्वादिष्ट प्रकार तसेच गावरान कोंबडीसोबत गरमा गरम तांदळाच्या भाकरीचा आणि मटण वडे यांची लज्जत खवैय्यांना मनमुरादपणे घेता येणार आहे. पावसाच्या सरींची रिमझिम बरसातसोबत फिश रिमझिम फ्राय, फिश तवा फ्राय, तंदूर म्हणजे खवैय्यांना थक्क करून सोडणारा एक कोंकणी अनुभव येथे अनुभवता येणार आहे.

कोंबडीवडे, मटणवडे, चिकन भंडारी, गावरान चिकन मराठा, खेकडा आगरी कालवण अशा विविध रूचकर खाद्यपदार्थांची येथे मांदियाळी आहे. भरलेला पापलेट, तिसऱ्या मसाला, क्रॅब सुक्का हे खाद्यपदार्थ येथे ज्या चवीने खाल्ले जातात त्या चवीच्या खासियतमुळे हॉटेलच्या नावलौकिकात अल्पावधीत भर पडली आहे.

तृप्तीचा ढेकर देऊन मांसाहारी खवैय्यांची मने जिंकणाऱ्या आस्वाद गोमंतक हॉटेलमध्ये आपला आखाड साजरा करणे म्हणजे अस्सल कोंकणचा स्वाद आपल्या जिभेवर रेंगाळत ठेवण्यासारखा आहे. कोकणी जेवणाच्या चवीसाठी ओठी येते ते एकच नाव “हॉटेल आस्वाद गोमंतक’.

संपर्क: 7745850009/7745840009

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)