#Foodiesकट्टा : पुण्याच्या हृदयातील हॉटेल ‘मेजवानी’ 

श्री आशिष गावडे व निवृत्ती गावडे या दोन्ही बंधूंनी मिळून त्यांचे पहिले हॉटेल अलिबागमध्ये सुरू केले आणि त्यातून मिळालेल्या अनुभवांतून या बंधूंनी पुण्याच्या हृदयात म्हणजेच सदाशिव पेठ येथे सुरू केलेले “हॉटेल मेजवानी’ हे आजकल पुण्यात चर्चेचा विषय बनले आहे.

सदाशिव पेठमध्ये हॉटेल व्यावसायिकांचा भडीमार असल्याने त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी त्यांच्या आसपासचे रेट, इतरांपेक्षा जास्त चांगली क्वालिटी व सर्वांना हवीहवीशी वाटणारी चव हे जपण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न या सर्वांमुळेच कदाचित ते खूप कमी काळामध्ये चर्चेस पात्र ठरले आहेत.

रसिक खवैय्यांसाठी “हॉटेल मेजवानी’ने खास आखाड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये पॉम्फ्रेट, सुरमयी, रावस, प्रॉन्स, बांगडा, बोंबील, खेकडा, तारली, मांदेली आणि राहू अशा विविध प्रकारच्या माशांचे चमचमीत डिशेसचा खवैय्यांना आस्वाद घेता येणार आहे तसेच वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या प्रकारच्या फिश करी सुधा चाखता येणार आहेत असे श्री आशिष गावडे सांगतात.

या सर्वांबरोबरच हॉटेल मेजवानी चे फेमस मेजवानी स्पेशल चिकन थाळी, स्पेशल मटन थाळी, स्पेशल फिश थाळी व साजूक तुपात बनवलेला चिकन काळा मसाला, मटण काळा मसाला यांचा आस्वाद रसिकांनी अवश्‍य घ्यावा असे श्री निवृत्ती गावडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.