बेनके यांना डॉ. कोल्हेंपेक्षा अधिक मताधिक्‍य देणार

रोहकडी येथील प्रचारात तुषार थोरात यांची ग्वाही

ओतूर – जुन्नर विधानसभा निवडणूक ही ऐतिहासिक असून डॉ. अमोल कोल्हे यांना ज्याप्रमाणे मताधिक्‍य मिळाले, त्यापेक्षा अधिक मताधिक्‍य अतुल बेनके यांना राहील, अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात यांनी रोहकडी (ता. जुन्नर) येथे दिली.

महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त रोहकडी येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले, यावेळी मतदारांशी संवाद साधताना थोरात बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मोहीत ढमाले, शरद लेंडे, सुदाम घोलप, अमोल घोलप, तुकाराम हिंगणे, नामदेव घोलप, ईश्‍वर केदारी, प्रकाश मुरादे, सुनील शिंदे, सदाशिव केदारी, नवनाख घोलप, रवींद्र घोलप, बाजीराव घोलप, पप्पु मुरादे, लक्ष्मण घोलप, महादू घोलप, वामनराव घोलप, सबाजी मुरादे, किसन घोलप आदी मांन्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, अतुल बेनके यांचे रोहकडी गावातील ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्य वाजवून आणि बैलगाडी मधून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.

शरद लेंडे म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे , नोटबंदी नंतर आलेल्या मंदी मुळे अनेक कारखाने बंद पडून लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत , शेती आणि शेतकरी यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस , कॉंगेस आणि आघाडीचे सरकार राज्याच्या सत्तेवर येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातले सरकार असून या सरकारने शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय केला आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार होता; परंतु आज आयात कांद्यामुळे तो कवडीमोल बाजारभावाने विकावा लागत आहे. सरकारने कांद्याची आयात बंद करून निर्यातीला परवानगी द्यावी.

– अतुल बेनके, महाआघाडीचे उमेदवार, जुन्नर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.