IMP NEWS | जाणून घ्या, करोना लस घेण्याचे फायदे? लस बनवणाऱ्या पूनावालांनी सांगितली महत्वाची माहिती…

मुंबई – करोनाची लस घेतल्यावरही काही जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बऱ्याच चर्चा सुरू असून लसीबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोविशील्ड ही लस तयार करणाऱ्या सीरमचे अदर पूनावाला यांनी याबाबत खुलासा करणारी उत्तरे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत.

ही लस घेतल्यास करोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल. त्याचबरोबर 95 टक्के केसेसमध्ये ही लस घेतल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. ही लस एकप्रकारची बुलेट प्रुफ जॅकेट सारखी आहे. गोळी लागल्यानंतर बुलेट प्रुफ जॅकेटमुळे माणूस मरत नाही, मात्र तुम्हाला थोडे फार डॅमेज होते. जानेवारीपासून आतापर्यंत 4 कोटी लोकांना डोस देण्यात आला आहे. हे लोक रुग्णालयात भरती आहेत का हे पाहावे लागणार असल्याचे आहे, असे पूनावाला म्हणाले.

ते पुढे म्हणाले तुम्हाला या व्हॅक्‍सिनमुळे आजारच होणार नाही, असे मी कधीच सांगितलेले नाही. लोकांमध्ये कदाचित अशा प्रकारचा समज झाला असावा, त्याबाबत सांगता येत नाही. आज बाजारात अनेक व्हॅक्‍सिन आहेत. त्या तुमचा संसर्ग होण्यापासून बचाव करत असतील. परंतु ही व्हॅक्‍सिन तुमची सुरक्षा करते. जागतिक आरोग्य संघटनेनेही या व्हॅक्‍सिनचे कौतुक केले आहे. त्यामुळेच सर्वांना लसीकरण करून घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यूरोपातून एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्‍सिनवर प्रश्न केले गेले आहेत. त्यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. युरोपात आता ब्लड क्‍लॉटिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु, नियामक आणि व्हॅक्‍सिनची तपासणी करणाऱ्यांना त्याची तपासणी करू द्यावी, त्यानंतर कोणत्या तरी तर्कावर आले पाहिजे. त्यासाठी थोडी वाट पहायला हवी असे ते म्हणाले. ज्या वयाच्या लोकांना लस दिली, त्यामध्ये ब्लड क्‍लॉटिंग होणे ही सामान्यबाब आहे. त्यामुळे यूरोपियन देशातील नागरिकांमध्ये अचानक ब्लड क्‍लॉटिंगचे प्रमाण वाढले का हे पाहिले पाहिजे. परंतु, भारतात ब्लड क्‍लॉटिंगची एकही केस आढळली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

करोना ज्या लोकांना झाला आहे आणि रुग्णालयात जे भरती आहेत त्यांना कोव्हिडशिल्ड लस देण्यात आली. यात दोन किंवा तीन टक्के नव्हे तर 90 टक्‍क्‍याहून अधिक एफिकेसी दिसून आली आहे. तेही केवळ एकाच डोसने, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.